Sunday, August 31, 2025

कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये आढळली जिवंत अळी

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कॅडबरी चॉकलेट आवडते. मात्र, कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेटमध्ये जिवंत अळी आढळल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.

तसेच, यासंबंधीचा व्हिडिओ या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. रॉबिन झॅकियस नावाच्या हैदराबादमधील एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, येथील मेट्रो

स्टेशनवरील स्टोअरमधून रॉबिन झॅकियस यांनी कॅडबरी चॉकलेट खरेदी केले होते. रॉबिन झॅकियस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे.

या अशा एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे? सार्वजनिक आरोग्याच्या धोक्याबाबत कोण जबाबदार आहे?” असा प्रश्न रॉबिन झॅकियस यांनी उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्धवट फाडलेल्या रॅपरमध्ये कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. या व्हिडीओसोबत खरेदीचे बिलही पोस्ट करण्यात आले आहे.

त्यात ९ फेब्रुवारीला ही कॅडबरी मेट्रो स्टेशनवरील रत्नदीप रिटेल शॉपमधून ४५ रुपयांना खरेदी केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रॉबिन झॅकियस यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित

करू लागले आहेत. दरम्यान, यावर रॉबिन झॅकियस यांनी केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्क कंपनीकडून रिप्लाय सुद्धा दिला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!