शेवगाव
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींच्या कपाळावर हळदी कुंकू लावतात. हळदी-कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे सौ.घुले यांचे उपस्थितीत हळदी-कुंकु व आनंद मेळावा उत्साहात पार पडला.त्यावेळी त्याबोलत होत्या.
सरपंच ललिताताई ढमढेरे, उपसरपंच वंदना घोटाळे,पल्लवीताई काटे,रुपाली सरोदे,अंबिका मातोडे,संगिता रक्टे, सविताताई गायकवाड, पुष्पाताई दसपुते,गंगुबाई गव्हाणे,सौ.उदमले मॅडम,सौ.आव्हाड मॅडम, डॉ. बांगर मॅडम, ज्योती डमढेरे, जयश्री दसपुते,माधुरी राजे भोसले,उषाताई राजे भोसले, मंगल ससाने,शारदा दसपुते,यासह मोठ्या महिलावर्ग उपस्थित होत्या.
सौ. घुले पुढे म्हणाल्या की,हळदी-कुंकू हे फक्त मकर संक्रांतीच्या सणालाच करतात असे नाही, तर इतर सणांना देखील एकमेकींना हळदी कुंकू लावण्याची प्रथा आहे. हळदी-कुंकू कार्यक्रम एकमेकींना हळदी कुंकू लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी एकमेकींना शुभेच्छा देण्याचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला समारंभाचे स्वरूप प्राप्त होते. मात्र आज शहरी भागात हे प्रमाण कमी होत असले तरी ग्रामीण भागात आजही ही प्रथा टिकून आहे.