माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी मोठा
गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांच्या अगोदर ही ऑफर होती असा दावा पी. आर. पाटील यांनी केला.
पी.आर. पाटील हे जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. जयंत पाटील यांना अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या एक वर्ष अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची
ऑफर होती, असा दावा पी. आर पाटील यांनी केला. फडणवीस यांच्या ऑफरवर जयंत पाटील यांनी आमच्याशी चर्चा केल्याचं देखील ते म्हणाले. अजित पवार गेले त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी जयंत
पाटील यांना तुम्ही सोबत आल्यास माझ्या बरोबर उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती, असं पी. आर. पाटील म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरनंतर जयंत पाटील यांनी माझी आणि काही ठराविक मंडळींना बोलावून घेतलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत पाटील यांनी बोलावलं आणि उपमुख्यमंत्रिपद मिळतंय जाऊ का असा प्रश्न विचारला. मात्र, त्यावेळी मी त्यांना साहेब स्पष्ट मत सांगतो अजिबात जायचं नाही, असं म्हणालो होतो. त्यानंतर
जयंत पाटील यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला, असं पी. आर. पाटील म्हणाले.मागील दीड वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजप मध्ये येण्याची विनंती केली होती.
मात्र, जयंत पाटील यांनी तेव्हा नकार देत खासदार शरद पावर यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे जयंत पाटील हे भाजप मध्ये जाणार असल्याच्या वावड्यावर विश्वास ठेऊ नये, असे वक्तव्य
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी कुरळप तालुका वाळवा येथील हनुमान पाणी पुरवठा संस्थेच्या निर्वाह निधी वाटप कार्यक्रमात केले.