Saturday, December 21, 2024

आमदार थोरातांचा विखे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या बातम्या आल्या. या निर्णयाकडे सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जाऊ लागले. खासदार सुजय विखे

यांनीही या निर्णयाचे क्रेडिट घेत जल्लोष केला. परंतु, त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, निर्यातबंदी उठवली नसल्याचे सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आले. यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर

टीकेची झोड उठवली आहे. तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही संधी साधत मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

कांदा निर्यातबंदी केली कशासाठी, कांद्याचे भाव वाढले. त्यावेळी निर्यातबंदी करून कांद्याचे भाव कोसळले. शेतकर्‍यांच्या लाभाऐवजी त्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला.

यांच्यातील श्रेयवाद फार मोठा आहे. कांदा निर्यात बंदीबाबत मोठमोठे फ्लेस बॅनर लावले गेले प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठलीच नाही त्यामुळे सध्या असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम चाललेला आहे, अशा

शब्दांत त्यांनी विखेंना खोचक टोला लगावला.थोरात यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ज्या पद्धतीने इतर पक्षातून

आलेल्यांना संधी दिली जाते त्यानुसार भाजपातील लोकांनाच आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.दक्षिणेचे वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल नगर दक्षिण मतदार संघाचे वातावरण

भाजपासाठी अनुकूल नसून महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचे दिसते. मंत्री विखेंनी त्यांच्या खात्याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. २२ कोटींचा महसूल वाळू आणि गौण खनिजामधून

मिळत होता. आता त्यांना व्यक्तिगत टीका करण्याचे कारण नव्हते. विचारांचा विरोध विचारांनी करणं महत्त्वाचं असतं परंतु मध्यंतरी मी भाषण केले होते ते त्यांच्या जिव्हारी लागले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!