Saturday, December 21, 2024

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोकसभा निवडणूकीची तारीख; निवडणूक आयोगाने पोस्ट शेअर करत सांगितलं सत्य

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात लोकसभा निवडणुका फार दूर नाहीत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान, इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर

एक मेसेज व्हायरल होत आहे ज्याद्वारे असा दावा केला जात आहे की, हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान होतील असा

दावा केला जात आहे. परंतु, हा संदेश बनावट आहे. निवडणूक आयोगानेच या संदेशाचे खंडन केले असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याचे म्हटले आहे.

 लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील विविध राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. २०२४ च्या

लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत एक मेसेज व्हॉटसअपवर फिरत आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगानेच संबंधित व्हायरल मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग

पत्रकार परिषद घेऊन करते, असंही सांगण्यात आलं आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या मेसेजवर केंद्रीय निवडणूक आयोगानंच स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत खोटा मेसेज व्हायरल होत असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. व्हॉटसअपवरुन शेअर केला जाणारा मेसेज चुकीचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा

अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या नाहीत, असंही सांगण्यात आलं आहे.निवडणूक आयोगानं ज्या मेसेजचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काही तारखा देण्यात आलेल्या आहेत.

त्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना, अर्ज दाखल करण्याची तारीख, मतदानाची तारीख आणि निकालाची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करत असतं. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे विविध राज्यांचे दौरे सुरु आहेत. निवडणूक

आयोग या दौऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनांची तयारी आणि इतर गोष्टींचा आढावा घेत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!