Sunday, December 22, 2024

जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील मराठा आरक्षणावरुन राजकारण होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अंतारवाली सराटीतून जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे.

मला संपवण्याचं कटकारस्थान होत आहे. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. जरांगेंना सहकाऱ्यांनी

थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते चालत निघाले आहेत. जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे.

फडणवीसांच्या म्हणण्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळेच, सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी

आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, मधेच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही

जरांगे यानी म्हटले. यावेळी, जरांगे यांनी आपल्या अंगावरील ब्लँकेट बाजुला सारुन माझ्या सलाईनच्या पट्ट्या काढून टाका, असे म्हणत जागेवरुन उठण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांना

त्यांना पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जातीजातीत भांडणं लावणं आणि जातीजातीच्या नेत्यांना संपवणे

असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. तसेच, मला राजकीय देणं घेणं नाही, मला फक्त मराठा

समाजाला आरक्षणासाठी लढायचं आहे. माझा बळी घ्या पण सगेसोयरेची अंमलबजावणी करुनच घेणार, सागर बंगल्यावर आंदोलन करायला येणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!