Saturday, December 21, 2024

फडणवीसांचं ऐकलं नाही तर काय होतं ते सांगतो” म्हणत जरांगे पाटलांनी घेतली ‘या’ भाजपा नेत्यांची नावं!

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र:मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा

दावा त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबरच भाजपातील काही नेत्यांचीही नावं घेतली.देवेंद्र फडणवीसांनी

मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण मिळू दिलं नसल्याचा दावा करत आपण आता थेट सागर बंगल्यावर दाद मागण्यासाठी जात असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तसेच, “माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या,

मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखवेन असं फडणवीसांना वाटतं.

मी आजपर्यंत त्यांना जातीवरून कधीच बोललो नाही. त्यांचं जर कुणी ऐकलं नाही, तर ते माणसं संपवतात. त्यांचं जो ऐकणार नाही, तो संपतो. त्यांना इतर कुणी पुढे गेलेलं खपत नाही. एखादी जात मोठी झालेली

चालत नाही. त्यांची गुलाम होऊन ऐकणारी जात त्यांना लागते. त्यामुळेच मला बदनाम करून संपवण्याचा कट आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ खडसे,

विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नावं घेतली. “एकनाथ खडसे कधीच भाजपा सोडू शकत नव्हते. त्यांच्यावर सोडायची वेळ आली. विनोद तावडे कधीच महाराष्ट्रातून बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांना दिल्लीला

जावं लागलं. नाना पटोले कधीच भाजपा सोडू शकत नव्हते, त्यांना जावं लागलं. पंकजा मुंडे, त्यांचे वडील आणि मामा आयुष्यात भाजपा सोडू शकत नाहीत. आज त्यांची अवस्था काय आहे. जो कधीच पक्ष सोडू शकत

नाही, त्यांनाही फडणवीसांमुळे पक्ष सोडावे लागलेत. ज्यांची नावं आली आहेत, त्यांनी शांतपणे फक्त मान हलवून तरी मान्य करावं”, असं जरांगे पाटील म्हणाले.महादेव जानकरांना ते कधीच धनगरांचा

नेता म्हणून मोठं होऊ देणार नाहीत. जीव गेला तरी प्रफुल्ल पटेल आयुष्यात राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. पण तुरुंगाचा एवढा धाक दाखवला की त्यांना ते करावं लागलं. अजित पवार कधीच राष्ट्रवादी काँग्रेस

सोडू शकत नव्हते. पण नाईलाज इतका केला, की तुरुंगात जाण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेलं बरं म्हणत तेही गेले”, असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!