Saturday, December 21, 2024

शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार, भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या जोरदार हालाचाली घडत आहेत. विशेष म्हणजे जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्येच

आता धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा समोर येताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतंच भाजपवर निशाणा

साधला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 115 असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं बोलून दाखवलं आहे. दोन्ही नेत्यांची वक्तव्ये थेट माध्यमांसमोर आल्याने पडद्यामागील

महायुतीतली अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. पुढच्या 8 ते 15 दिवसांत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा घोषणा होऊ शकते.

त्यामुळे जागावाटपावरुन महायुतीत जबरदस्त खलबतं सुरु आहेत. भाजप या निवडणुकीत तब्बल 36 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार असल्याची

माहिती सूत्रांनी दिली आहे. यवतमाळ, हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, नाशिकच्या जागेवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या जागांवरुन शिवसेना आणि भाजपमधील

जागावाटपाचं घोडं अडलं आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या भावना गवळी या खासदार आहेत. पण त्यांच्यावर ईडीचे आरोप असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गजानन कीर्तिकर खासदार आहेत. पण इथे भाजपकडून त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर समाज माध्यमांवर

आरोप करण्यात आल्याचा दावा केला जातोय. हिंगोली मतदारसंघात भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!