Saturday, December 21, 2024

म्हणून जोडप्यांवर येते विवाहबाह्य संबंधाची वेळ, प्रमाण वाढण्यामागची कारणे ऐकून सरकेल पायाखालची जमीन, व्हा सतर्क

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंध अर्थात एक्स्ट्रा मॅरीटेल अफेअर्स मध्ये सातत्याने वाढ होत आहे. या बाबींचा

परिणाम समाजातील सर्व घटकांवर होत आहे. आणि लोकांना सुद्धा पूर्ण जाणीव आहे की विवाहबाह्य संबंधांचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर खोलवर परिणाम होतो आणि आजही ही गोष्ट समाजात

स्वीकारली जात नाही, परंतु असे असूनही, विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत.देशभरात विवाहबाह्य संबंध वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. काही लोक

कुटुंबाच्या आणि समाजाच्या दबावामुळे लग्न करतात. मात्र, एक विशिष्ट वयोमर्यादा ओलांडल्यानंतर त्यांना आपल्या लाईफ पार्टनरबद्दल फारशी ओढ नसल्याचे लक्षात येते आणि काही काळानंतर अनेकांना

त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होतो. अशा वेळी जर त्यांना त्यांच्या जोडीदारापेक्षा चांगली व्यक्ती भेटली तर ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रमुख कारण बनते.कमी वयात लग्न करणारे बरेच

लोक आहेत. असे केल्याने ते त्यांच्या संसारच्या बाबतीत जीवनात स्थिरता प्राप्त करतात, परंतु काही काळानंतर, त्यांना त्यांच्या नातेसंबंधात रोमान्स आणि डेटिंगचा अभाव जाणवतो. त्यामुळे

अनेकदा एखादी व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये अडकते.जेव्हा विवाहित जोडपे पालक बनतात, तेव्हा त्यांचे नाते प्रत्येक अर्थाने बदलू लागते. एकत्र घालवण्यासाठी मिळणारा वेळ कमी

होतो आणि अचानक त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात असे वातावरण तयार होते. अशा अनेक स्त्रिया आहे आहेत ज्या मुलाच्या जन्मानंतर आपले 100 टक्के मुलाला देण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पुरुष

म्हणजेच पती एकटा आणि दुर्लक्षित राहू शकतो किंवा त्याला तसे वाटू शकते. विवाहबाह्य संबंधांसाठी हे देखील एक प्रमुख कारण ठरताना दिसून येते.विवाहबाह्य संबंध असण्याचे प्रमुख कारण म्हणजे भावनिक किंवा लैंगिक

संबंध नसणे. आपल्या पार्टनरसोबत लैंगिक संबंधांमध्ये रस नसल्यामुळे लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडेही वळतात.आजच्या जीवनातील बदल आणि आव्हाने हेही यामागे मोठे कारण आहे.

जेव्हा लहान आव्हाने येतात तेव्हा लोक जुळवून घेतात, परंतु नोकरी गमावणे, आर्थिक नुकसान, गंभीर आजार इत्यादीसारख्या मोठ्या आव्हानांना हाताळणे कठीण असते. आपल्या जोडीदाराला सोडून इतर कोणाचा तरी आधार मिळणे

लोकांना सोयीचे वाटते असे अनेकवेळा दिसून आले आहे. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!