नेवासा/प्रतिनिधी
तालुक्यातील कारवाडी (पाचेगांव) येथे अज्ञात इसमाने अज्ञात बाळासाहेब सखाहारी तुवर (वय 60 वर्षे) रा. कारवाडी (पाचेगांव) ता. नेवासा या व्यक्तिचा खून केल्याची घटना मंगळवार दि.१२ मार्चचे मध्यरात्री घडली आहे.
याबाबद विष्णु गंगाधर तुवर (वय 37 वर्षे) धंदा- मजुरी रा. पाचेगांव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद लिहुन दिली की, आमचे गावामध्येच माझे चुलते बाळासाहेब सकाहारी तुवर हे त्यांचे कुटुंबासह रहावयांस असुन त्यांनी लोखंडी फॉल बेलपिंपळगाव येथे नानासाहेब संत यांचे हॉटेल सुमारे 8 महीन्यापासुन भाडयाने चालवायला घेतले असुन तेथे चुलते हे चहा व वडापावचे हॉटेल चालवुन त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. चुलते बाळासाहेब सखाहारी तुवर व चुलती असे दोघेजण दिवसभर हॉटेल चालवुन चुलती हिस नेहमी प्रमाणे चुलते बाळासाहेब तुवर हे जवळच असलेले कारवाडी (पाचेगांव) येथील रहाते घरी रात्री 09 वाजेच्या सुमारास सोडवुन पुन्हा त्यांचे हॉटेल- आमसाइ येथे रात्री 10 वाजता हॉटेल बंद करुन तेथेच ते एकटेच झोपत होते.
दि.13/03/2024 रोजी सकाळी 08/30 वाजेच्या सुमारास मी पाचेगांव गावात असतांना मला माझे नातेवाईक नामे दादा बाबुराव पवार रा. कारवाडी (पाचेगांव) ता. नेवासा यांचा फोन आला व त्यांनी मला फोनवर सांगितले की, तुमचे चुलते नामे बाळासाहेब सखाहारी तुवर हे त्यांचे कारवाडी (पाचेगांव) येथील हॉटेल ओमसाइ मध्ये जखमी अवस्थेत पडलेले आहे. तुम्ही लवकर या असे त्यांनी मला फोनवर सांगितल्याने मी माझा भाउ शंकर गंगाधर तुवर, दाजी राजेंद्र गंगाधर पवार असे आम्ही पाचेगांव येथुन कारवाडी येथे गेलो असता तेथे लोकांची गर्दी जमलेली होती. तेंव्हा आम्ही पाहीले की, माझे चुलते हे चालवित असलेले हॉटेल- ओमसाइ मध्ये जखमी अवस्थेत रक्ताचे थारोळ्यात अंथरुणावर पडलेले आम्हांला दिसले त्यानंतर आम्ही त्यांचे जवळ जावुन पाहीले असता आम्हांला त्यांचे डोक्याला जखम होवुन कानातुन रक्त येवुन त्यातच ते मयत झाल्याचे दिसले त्यानंतर नेवासा येथील पोलीस आले त्यांनी चुलते बाळासाहेब सखाहारी तुवर यांचे मृतदेह अम्बुलन्स मध्ये घालुन पोस्टमार्टम करीता ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा ता. नेवासा येथे घेवुन गेले आहे.
तरी दि. 12/03/2024 रोजी रात्री 10/00 वा. ते दि. 13/03/2024 रोजी सकाळी 08/30 वाजेच्या दरम्यान हॉटेल ओमसाइ कारवाडी (पाचेगांव) ता. नेवासा येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता चुलते नामे बाळासाहेब सखाहारी तुवर वय 60 वर्षे रा. कारवाडी (पाचेगांव) ता. नेवासा जि. अहमदनगर यांना जिवे ठार मारण्याचे उदेशाने त्यांचे डोक्यात काहीतरी टनक हत्याराने त्यांना जबर मारहान करुन त्यांना जिवे ठार मारले आहे. म्हणुन माझी अज्ञात इसमाविरुध्द तक्रार आहे.या फिर्यादिवरुन नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेवासाचे पोलीस निरक्षक धनजंय जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा स्टाफ घटनास्थळी हजर झाला. फिंगर प्रिंट एक्सपर्ट व FSL मोबाईल पाचारण केली करून आवश्यक कारवाई करून अज्ञाताचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणत आहेत.