नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आदित्य बाबासाहेब देशमुख यांची सन २०२३-२४ च्या महाराष्ट्र शासन अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरतीत कुकडी सिंचन मंडळ अंतर्गत कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे क्रमांक-२ श्रीगोंदा येथे कनिष्ठ लिपिक पदी निवड होऊन त्यांनी २० सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या कामाचा पदभार स्वीकारला.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी बाबासाहेब देशमुख यांचा तो मुलगा असून त्याला श्री ज्ञानेश्वर ग्रंथालय व तेथील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या निवडीबद्दल कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी यांचे हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, लीगल ऑफिसर अड.सुनील शिंदे,कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे,उपाध्यक्ष संजय राऊत,भाऊसाहेब सामृत,सचिन मरकड,बंशी महाराज गर्जे, ग्रंथापाल पोपटराव उगले, अभिषेक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.