माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल, पक्षांतर्गत बंडाळी माजेल, राजकारण्यांच्या वेळकाढूपणामुळे आरक्षणाचा वाद वाढेल, याचा फटका राजकारण्यांना बसेल,
दहशतवादाने पाकिस्तान संपुष्टात येईल,नेत्यांच्या वर्चस्ववादातून दिल्लीच्या गादीला हादरा बसेल, जगाच्या पाठीवर भारत महासत्ता बनेल, अशी भाकणूक भगवान पुजारी व भागोजी रानगे यांनी वाशी येथील शिवेवरील बिरदेव मंदिरात केली.
महाराष्ट्रातील यंदाची ही पहिली भाकणूक हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी ‘बिरदेवाच्या नावानं चांगभलं…’चा गजर करत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. दरम्यान, धनाजी बनकर यांच्यासह बनकर बांधव हेडाम खेळले.
देवस्थानचे देवऋषी भगवान पुजारी व भागोजी रानगे यांची भाकणूक झाली. ऋतुमान जनतेला हवालदिल करेल, डोंगर पर्वत वसरून जातील, सर्वत्र जळमळ पाणी होईल, गुन्हेगारी वाढेल,राज्यकर्त्यांच्या दहशतीमुळे जनतेचा न्यायदेवतेवरील विश्वास उडेल, खऱ्याने
वागशीला टिकून राहशीला, जो मनापासून माझी सेवा व भक्ती करेल त्याला पोटाशी धरीन, त्याचा सांभाळ करून त्याच्या कुटुंबाचा उद्धार करेन. यावेळी अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, माजी अध्यक्ष बिरू धनगर,
भागोजी पुजारी, आनंदा पुजारी, भगवान पुजारी, आनंदा राणगे, संतोष रानगे, वसंत पुजारी, सुभाना रानगे, पा हजारे, कृष्णात लांडगे आदींसह ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.