नेवासा
नेवासा फाटा येथे ६ वर्षा पासून कार्यरत असलेल्या अक्षय ग्रामीण युवा क्रिडा व सामाजिक विकास संस्था संचलित शरणपूर वृद्धाश्रमाचे फत्तेपूर येथे स्थलांतर झाले आहे.
नेवासा तालुक्यातील फत्तेपुर येथे दि. दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सीएसआरडीचे माजी संचालक व योगगुरु केवल कृष्ण कनोजिया यांच्या अध्यक्षतेखाली शरणपूर वृद्धाश्रमाचा ६ वा वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा संपन्न झाला.कॉ. बाबा आरगडे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सुनिल वाबळे, निलेश रासकर, सिस्टर रिटा,राजू जाधव , सरपंच निलोफर शेख, उपसरपंच दत्तात्रय गवते,शरणपुर वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष मुसाभाई अत्तार, सुरेखा मगर,भानुदास गायकवाड, जयवंत मोटे, रामेश्वर लवांडे ,राजू जाधव,एरंडे सर , ऍड महेश शिंदे,पोपटराव बनकर,युवराज गव्हाणे,दत्तात्रय दाभाडे ,मुटकुळे बाळासाहेब, मुटकुळे , मीनाताई औताडे , सुकेशनी चौधरी,संस्थेच्या सचिव सुरेखा मगर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.केवल कृष्ण कनोजिया म्हणाले की, माझा एक विद्यार्थी गावपातळीवर सर्व माता-पित्यांना आधार देतो याचा मला अभिमान वाटतो.हा खुप मोठा संघर्ष आहे. हे खुप मोठ काम रावसाहेब मगर यांनी हाती घेतले आहे. या कार्याला आपण सर्वांनी हात देऊन या वृद्धाश्रमाला मदत करावी असे आवाहन केले.
कॉ. बाबा आरगडे म्हणाले की, रावसाहेब मगर यांनी हे काम हाती घेतलेल्या कामाला आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात दररोज पाच-दहा रुपये बाजूला काढून एक वर्षभर असे केल्याने खुप चांगली मदत आपल्याला याठिकाणी करता येईल. निश्चित यश मिळेल, चांगल्या कामाला कधीच कमी पडत नाही असे बाबा आरगडे यांनी सांगितले.
शरणापुर वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.संतोष मगर यांनी आभार मानले.