Monday, March 30, 2026

वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

अखेर आज वाल्मिक कराड शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये त्याने हजेरी लावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!