भेंडा/नेवासा
नेवासा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेवासा तालुक्यातील यशस्वी कार्यकिर्दीला १ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल भेंडा ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. मुळा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. शिवाजी शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेवराव निकम, माजी सरपंच गणेश गव्हाणे,पत्रकार सुखदेव फुलारी,नामदेव शिंदे, भेंडा सोसायटीचे अध्यक्ष अड.रवींद्र गव्हाणे,डॉ.लहानू मिसाळ, डॉ.संतोष फुलारी, डॉ.दिलीप यादव,देवेंद्र काळे, नयन फुलारी, बाबासाहेब गव्हाणे, सुरज गव्हाणे, रामभाऊ देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गणेश गव्हाणे, नामदेवराव निकम,सुखदेव फुलारी यांनी आपल्या मनोगतात श्री.जाधव हे या एका वर्षात तालुक्यात कायद्याविषयीची जनजागृती करून गुन्हेगारांवर कायद्याची जरब बसविण्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात,कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले .देवेंद्र काळे यांनी आभार मानले.