नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेला राज्य पातळीवरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संस्थेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय काळे व रिजनल ऑफिसर यशवंत मिसाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
महाराष्ट्रात संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने अविज पब्लिकेशन,कोल्हापूर व गॅलेक्सी इन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी बँक ब्लू रीबन पुरस्कार दिला जातो. अम्बी व्हॅली सिटी, लोणावळा येथे दि.३० जानेवारी रोजी झालेल्या बँको सहकार परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबाबद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे म्हणाले की, अथक प्रयत्नाने व गुणवत्तेबद्दलच्या कटिबध्दतेमुळे प्रतिष्ठेचा हा सन्मान आपल्या संस्थेस मिळाला आहे. मेहनतीने व परिश्रपुर्वक केलेल्या योगदानाची पावती माध्यमातून प्राप्त झाली आहे.
सभासद,ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत संस्था प्रगती करत आहे.