अहिल्यानगर/प्रतिनिधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची बैठक अहिल्यानगर येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश गोखले, कार्याध्यक्ष बाळासाहेब वसु , कोषाध्यक्ष विजय समदुरकर, सरचिटणीस राजाराम विठाळकर हे अहिल्या नगर जिल्ह्याच्या शाखा भेटीवर आले होते. त्यानिमित्त मंगळवार दि. १७/६/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता तारकपूर येथील संघटना कार्यालयातील प्रांगणात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आर.जी.गांधी होते.
यावेळी बोलतांना सरचिटणीस राजाराम विठाळकर म्हणाले की,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र भर ३० जिल्हा शाखा असून ५२०० सदस्य संख्या आहे. अतिशय पारदर्शक कारभार चालूं असल्याने सदस्य संख्या वाढत आहे. जेंव्हा जेंव्हा सेवा निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय होतो, चर्चा करून तडजोडीने प्रश्न निकाली निघत नाहीत, तेंव्हा तेंव्हा नाविलाजास्तव न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो.अधिकारी सकारात्मक नसतात, त्यांची सकारात्मक प्रवृत्ती नसते, तेंव्हाच संघटनेला न्यायालयात दाद मागण्यासाठी जावे लागते. भविष्यातही आपल्याला आपले क्लेम हवें असतील तर सर्वांनी संघटीत होणे आवश्यक आहे.
सहमतीने न सुटणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेची गरज असते.संघटणेच्या माध्यमातून कोर्टात गेल्यामुळे शासनाच्या पळवाटा बंद होतात. आणि बजेटमध्ये स्पेशल तरतूद करावी लागते. तेंव्हा कुठे आता आपल्याला सातव्या वेतन आयोगाचा काही फरक मिळाला. अनेक वेळा शासनाने निधी नाही म्हणून फरक देणें टाळले होते. पण संघटना कोर्टात गेल्यामुळे सुप्रीम कोर्टाने गेल्याने प्रश्नमार्गी लागला.
अध्यक्ष गणेश गोखले, कार्याध्यक्ष बाळासाहेब वसु , कोषाध्यक्ष विजय समदुरकर यांनी जीवन प्राधिकरणचा आत्ता पर्यंतचा इतिहास सांगून संघटनेची स्थापना कशी झाली, तिचं वैशिष्ट्य काय?आणि तिचे कार्य कसे चालते यांवर अभ्यासपूर्ण माहिती दिली.
बैठक सुरू होण्यापूर्वी दिवंगत झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जोंधळे यांनी आलेल्या राज्य पदाधिकारी यांचा शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला. त्याबरोबरच ७५ वर्षाच्या पुढील अधिकारी-कर्मचारी प्रेमसुख सोनाग्रा , विनायक ढेपे, सी.पी.वाघ, एस.एस. गोहाड,विजय कुलकर्णी, श्री.तांबोळी,विश्वनाथ सोनार, काशिनाथ क्षीरसागर,अब्दुल शेख यांचा जिल्हा शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हा संघटक विष्णू गायकवाड, सुरेश चुटके यांनी या बैठकीसाठी जिल्ह्यातून आलेल्या इतर अधिकारी कर्मचारी यांचा गुलाब फुले देऊन सत्कार केला.
ए. टी.डफळ कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. आर.एस.थोरात यांनी सुत्रसंचालन केले. बी.टी.सुरोशी यांनी आभार मानले.