भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा,संतशिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी दि.२३ जुलै रोजी नागेबाबा मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
नागेबाबा परिवार व नागेबाबा देवस्थानने आयोजित केलेल्या या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सकाळी अड.रविंद्र गव्हाणे व सौ.उज्वला गव्हाणे या उभयंतांचे हस्ते महादेवास अभिषेक करण्यात आला. तसेच नागेबाबा समाधिला गंगाजलाने जलाभिषेक करण्यात आला.
त्यानंतर सकाळी १० वाजता ज्ञानेश्वर महाराज सबलस यांचे कीर्तन होऊन उपस्थित भाविकाना महाप्रसाद देण्यात आला.दुपारी संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सांयकाली ६ वाजता श्रीक्षेत्र देवगडचे प्रकाशनंदगिरी महाराज यांनी नागेबाबा समाधिचे दर्शन घेतले.
नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडुभाऊ,
काशिनाथ नवले,अंकुश महाराज कादे,तुकाराम मिसाळ,दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे,देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी तागड,देवीदास गव्हाणे, जलमित्र सुखदेव फुलारी,नामदेव शिंदे,
गणेश गव्हाणे,अशोक वायकर,नामदेव निकम,पंढरीनाथ फुलारी,बापूसाहेब नजन,अंबादास गोंडे, अशोक गव्हाणे,गणेश महाराज चौधरी,गणेश कुलकर्णी, नागेबाबा पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, सरव्यवस्थापक भरत दारुंटे, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारीअक्षय काळे,
प्रादेशिक अधिकारी यशवंत मिसाळ, पोपट जमदाडे, विकास अधिकारी कन्हैया काळे, शाखा व्यवस्थापक दिलदार शेख,संजय मनवेलीकर, आबासाहेब काळे,सुनील गव्हाणे,अजित रसाळ,राजेंद्र चिंधे,संजय नवले,नानाभाऊ नवले, डॉ. लहानु मिसाळ,किशोर मिसाळ,वाल्मीक लिंगायत, विश्वास कोकणे यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी परिश्रम घेतले.
नागेबाबा पतसंस्थेने घडविले १६०० भाविकांना दर्शन….
नागेबाबा पतसंस्थेने राज्यभरातील विविध शाखेंच्या माध्यमातून वाहनातून अहिल्यानगर, बीड, जालना,छत्रपती संभाजीनगर, नाशिक,पुणे जिल्ह्यातील ७२ शाखांमधून सुमारे १६०० भाविकांना भेंडा येथे आणून नागेबाबांचे दर्शन घडविले. आलेल्या या भविकांचे
नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी प्रसाद व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.