नेवासा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेमध्ये प्रयोगशाळा ,ग्रंथालय इत्यादी बाबी असणे आवश्यक आहेत.प्रयोगाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते असे प्रतिपादन आ.विठ्ठलराव लंघे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील जयभवानी ग्रामीण शिक्षण संस्थेचे वै.बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालयाच्या नूतन प्रयोगशाळा इमारतीचे भूमिपूज आ. विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.
राजेंद्र लोखंडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. अंकुशराव काळे, अड.विश्वास काळे, संस्थेचे सचिव रामदास नजन, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव राशिनकर ,विनायकराव चौधरी, जालिंदर वाकचौरे ,नितीन कापसे ,संभाजी लोंढे, तुषार शिंदे, शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, संचालक सुनील दानवे, तज्ञ संचालक उद्धवराव सोनवणे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,
सोपानराव लोखंडे ,श्रीराम देशमुख
कार्यक्रमास उपस्थित होते.
मुख्याध्यापक बाळासाहेब पंडित यांनी
प्रस्ताविकामध्ये शाळेचा सुरुवातीपासूनचा इतिहास सांगतांना शिक्षक मित्रांनी शाळेला खूप सहकार्य केले. अडचणीचा बाऊ करत बसण्यापेक्षा त्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शैक्षणिक कार्याला राजेंद्र लोखंडे यांचे
सहकार्य असते तसेच मावळ तालुका शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब खोसे यांनी प्रयोगशाळा साहित्य पुरविले जाईल असे आश्वासन दिले आहे.
विद्यालयातील शिक्षक नितीन गडाख,भाऊसाहेब अकोलकर ,गणेश आरगडे,बाबासाहेब पेहेरे,प्रशांत आरेकर,श्रीमती शकुंतला काळे व शिक्षकेतर कर्मचारी,पालक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
शिक्षक बापू सरोदे यांनी सूत्रसंचालन
केले.बाबासाहेब पेहेरे यांनी आभार
मानले.