नेवासा
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहायक कार्यकारी अधिकारी व माजी विश्वस्त नितीन सुर्यभान शेटे वय ४२ यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.
सोमवार दि २८ रोजी सकाळी हि घटना उघडकीस आली. शिंगणापूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथे पाठवला असून आत्महत्या का केला याची पोलिसांकडून माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,भाऊ असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी सुर्यभान शेटे यांचे ते मुलगा होत.