शेवगाव/प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत (निवृत्त एसीपी) यांचे अध्यक्षतेखाली व कॉम. बाबा आरगडे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेवगाव शाखेची पुनर्रबांधणी करण्यात आली असून शेवगाव शाखेच्या
अध्यक्षपदी बबनराव धावणे,कार्याध्यक्ष पदी डॉ.गणेश चेके तर सचिव पदी वसंत जगधने यांची निवड करण्यात आली आहे.
शेवगाव येथील उचल फाउंडेशन येथे रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता झालेल्या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, प्रधान सचिव देवदत्त साळवे,जात पंचायत जिल्हा कार्यवाह कारभारी गायकवाड, शोसल मीडिया जिल्हा कार्यवाह सुखदेव फुलारी,डॉ.संजय लड्डा, डॉ.गणेश चेके, प्रा.चिमाजी धनवडे, प्रा.किसनराव माने, देवदत्त साळवे, प्रा.बबनराव धावणे,हरिशचंद्र शिंदे,अड राहुल बुधवंत,अशोक शेवाळे,आदिनाथ दहातोंडे,प्रथमेश सोनवणे,वसंत जगधने,भगवान काटे, मोतीलाल बंसवाल,संजय खेडकर आदि यावेळी उपस्थित होते.
*शेवगाव शाखा कार्यकारणी:—*
१)अध्यक्ष- बबनराव धावणे
२)कार्याध्यक्ष- डॉ.गणेश चेके
३) सचिव- वसंत जगधने
४)उपाध्यक्ष-किसनराव माने व चिमाजी धनवडे
५)बुवाबाजी कार्यवाह- प्रथमेश सोनवणे