नेवासा/सुखदेव फुलारी
जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड, खत पाणी व्यवस्थापन करून एका एकरात २.५ (अडीच) किलो वजनाचे ४० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन उत्पादन नक्की मिळेल असे ठाम प्रतिपादन ऊस पिक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले.

भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवार दि.३ संप्टेंबर रोजी बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर सभामंडपात ऊस पिक परिसंवाद व शेतकरी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना श्री.माने बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडूरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख, डॉ.क्षितीज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे,काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ,प्रा.नारायण म्हस्के, बबनराव भुसारी,भाऊसाहेब कांगुणे, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, जनार्दन कदम,सखाराम लव्हाळे, विकास नन्नवरे, विष्णुपंत जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रविंद्र मोटे, कृषि विज्ञान केंद्रप्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक,बाजीराव मुंगसे,कारभारी चेडे, सुखदेव महाराज मुंगसे, चंद्रकांत मुंगसे, प्रभाकर कोलते,अजित मुरकुटे, संतोष म्हस्के आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
*श्री.माने पुढे म्हणाले की, एकरी १०० ते १५० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी
ऊस लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत महत्वाची आहे. जमिनीत १ टक्के पेक्षा अधिक सेंद्रिय कर्ब असला पाहिजे,तो वाढविण्यासाठी ताग-डेंच्याची हिरवाळीचे खते दयावीत,पाचरटाचे आच्छादन करावे. शेणखत/कंपोस्ट,कोंबडी खतांचा वापर करावा.पाण्याचा निचरा व्यवस्थीत होईल याची काळजी घ्यावी. फ्लोने पाणी देत असाल तर कमीत कमी ४ फुट सरी आणि ठिबक सिंचन असेल तर कमीत कमी ५ फूटी सरी असावी. लागवडी करिता को-८६०३२ ही ऊस जात सर्वात उत्तम आहे. तोडणी पर्यंत कांडयाची वाढ होत रहाते,वजन आणि साखर उतरा उत्तम आहे.
दोन टिपरातील अंतर १ फुटापर्यंत ठेवावे, एक डोळा पद्धतीने लागवड केल्यास कमी वयाची रोपे लावावीत. २ रोपा मधील अंतर १.५ ते २ फुट ठेवावे. दोन सऱ्यातील अंतर जास्त असेल तर सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो, आंतरपीक घेता येते, यांत्रिक मशागत करता येते, आच्छादन करता येते, ठिबक सिंचन नळ्यांचा खर्च कमी होतो. सरीचा आकार इंग्रजी ‘व्ही’ नव्हे तर ‘यू, प्रमाणे असावा. सरीला १० ते १२ सेंमीचा हलकासा उतार द्यावा.
ऊस लागवड करतांना हंगाम कालावधी लक्षात घ्यावा. योग्य जातीचे आणि ८ ते १० महीने वयाचेच बेणे निवडावे. मोठी बांधणी करत्या वेळी एकरी ५० ते ५५ हजार तर तोड़नीच्या वेळी ४० ते ४५ हजार ऊस संख्या असावी, एका ऊसाचे वजन २.५ ते ३ किलो असावे,म्हणजे एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष नक्की गाठता येईल.
खत व्यवस्थापन करतांना माती परीक्षण करून आणि जमिनीचा सामु बघून खते दयावीत.१०० टन उसाचे लक्ष गाठण्यासाठी एकरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश द्यावे.खते देतांना ती मातीआड़ करून हलके पाणी द्यावे. जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करावा. योग्य पद्धतीने तण आणि किडीचे नियंत्रण करावे.

*माजी आमदार नरेंद्र घुले पाटील* म्हणाले की,आपला ज्ञानेश्वर कारखाना सर्व दृष्टिने परिपूर्ण झालेला आहे. हंगाम सूरु होण्याचे पहिल्या दिवसापासून दररोज ९५०० मेट्रीक टन ऊस गाळप व दीड लाख लीटर इथेनॉलची निर्मिति होईल. आता केवळ ऊसाला भाव द्यायचा आहे.तुम्ही एकरी ऊस उत्पादन वाढवा,आपण सगळ्यात चांगला भाव देऊ अशी ग्वाही देवून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या जयंती दिनी १५ सप्टेंबर रोजी एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती श्री.घुले यांनी दिली.
*जैव शास्रज्ञ डॉ. भास्कर ताकटे* यांनी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या जैविक खतांची माहिती व त्याचा वापराने होणारा फायदा यांची माहिती दिली.
—————————————————————
यावेळी कारखाना जैविक लॅब मध्ये तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन प्रमाणित ग्रेड १, ४ व ६ सूक्ष्म अन्नद्रव्याचे लॉचिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
————————————————————–
या ऊस परिसंवादास कडूभाऊ तांबे,बंशी मुंगसे, बाबासाहेब मुंगसे, साहेबराव कदम,कुंडलीक कदम, हनुमंत गटकळ, सुनील मुथा,एकनाथ भुजबळ, देवीदास पाटेकर, अंबादास कळमकर, बबनराव भानगुडे,भगवान गंगावणे, गोरक्षनाथ काळे, कुमार नवले, हरिभाऊ नवले, कचरदास गुंदेचा, वैभव नवले, आप्पासाहेब देशमुख, दत्ता मुंगसे,दिगंबर ताके, रामकृष्ण नवले, सागर बनसोडे, नवनाथ मुंगसे, राजेंद्र कदम, हरिभाऊ मुंगसे, अरुण वांढेकर, नवनाथ मुंगसे, हरिभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकरी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, सिव्हिल इंजिनियर सुधाकर ढाकणे आदिसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अंभग यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.संचालक प्रा.नारायण म्हस्के यांनी आभार मानले.
सदर ऊस परिसंवाद फेसबुक वर ऑनलाईन पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा….
https://www.facebook.com/share/v/1ZtHWgJoDb/


