Sunday, March 29, 2026

नेवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अड.अजय रिंधे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील अड.अजय रिंधे यांची नेवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नेवासा तालुका वकील संघांची निवडणुक सहा महिन्यापुर्वी पार पडली होती. या निवडणुकीत कुकाणा येथील अड.गणेश निकम यांना तसेच जेऊर हैबती येथील अड. अजय रिंधे यांना समसमान मते पडली होती. त्यावेळी दोघांच्याही सहमतीने सहा-सहा महिने अध्यक्ष पद भूषवण्याचे ठरले होते. त्यानुसार अड.निकम यांना सहा महिने
पूर्ण होताच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुन्हा अध्यक्ष निवडीसाठी
गुरुवार दि.४ सप्टेंबर रोजी वकील संघाची सभा बोलवण्यात आली होती. या सभेत अड.अजय रिंधे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड होताच जिल्हा व अति सत्र न्यायाधीश एच.आर.वाघमारे, आर.आर.हस्तेकर, वरीष्ठस्तर दीवाणी न्यायाधिश एस. एन. भोसले, व्ही. एन. मोरे यांनी नुतन अध्यक्ष रिंधे यांचा सन्मान केला.
यावेळी उपाध्यक्ष अड.सुदाम ठुबे, कल्याण पीसाळ, निरज नांगरे,एजाज देशमुख,रवींद्र पागिरे,भागवत शिरसाठ,पांडुरंग माकोणे,भारत चव्हाण,संदीप कापसे,बाळासाहेब गरड,देविसिंह देशमुख,दिनकर घोरपडे,पंढरीनाथ अंबाडे,सोमनाथ गांगले,गणेश खिळदकर,साईनाथ हुळहुळे,पारस नाहार,प्रदीप वाखुरे, तात्यासाहेब ढोकणे,विजय चंगेडीया, रमेश पांडे,बाळासाहेब काळे, ज्ञानदेव जाधव,सादीक शिलेदार,जावेद इनामदार,रविंद्र गव्हाणे आदी उपस्थित होते.

 

*अड.अजय रिंधे(नूतन अध्यक्ष)…

वरिष्ठ-कनिष्ठ असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन न्यायालयाच्या इमारत बांधकामाच्या प्रश्नासह विविध उपक्रम राबवून नामांकित कायद्याचे अभ्यासकांचे मार्गदर्शन शिबिरासह वकील संघाच्या हिताचे निर्णय घेण्याचे प्रयत्न करणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!