ओनेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात ६५ टक्के पर्जन्यमान झाल्याची अट्ट न धरता वास्तवात शेत पीकांचे नुकसान पाहून पंचनामे करण्याच्या सुचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पीकांचे पंचनामे करुन बळीराजाला नुकसान भरपाईचा हात देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता प्रत्यक्षात नेवासा तहलिलदार डॉ.संजय बिरादार यांनी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेत पीकांचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला दिलेले असतांना या पथकाने प्रत्यक्षात माञ तालुक्यातील ६५ टक्के पर्जन्यमान झालेल्या शेतकऱ्यांच्याच पीकांचे पंचनामे करण्याचे काम सुरु केले व इतर शेतकऱ्यांच्या शेती पीकांचे नुकसान होऊनही त्यांचे पंचनामे केले जात नसल्यामुळे पुन्हा एकदा आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रातांधिकाऱ्यांना यांना ६५ टक्के पर्जन्यमानची अट्ट न धरता प्रत्यक्षात शेत पीकांची नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे आता वचिंत शेतकऱ्यांच्या शेती पीकांचेही पंचनामे केले जाणार असल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याचे शेतकऱ्यांतून मोठे कौतुक केले जात आहे.




