नेवासा/प्रतिनिधी
नेवासा येथील श्री ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई विद्यालय येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसराची स्वच्छता केली.

गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या मंदिर सेवा स्वच्छता उपक्रमात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दर महिन्यातून एकदा आम्ही सेवा देवू,असे यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी सांगितले.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी गुरूवर्य देविदास बाबा यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात सर्व शाळांनी सहभाग घ्यावा व आपली सेवा द्यावी असे आव्हान केले.
मंदिराचे विश्वस्त रामभाऊ जगताप, कृष्णा अण्णा पिसोटे व शाळेचे शिक्षक अमोल दहातोंडे,शिक्षक काकासाहेब काळे ,शिक्षिका सुनीता दिघे व ज्योती गडाख हे यावेळी उपस्थीत होते.




