नाशिक/प्रतिनिधी
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या विद्यमाने तयार करण्यात आलेल्या सन २०२५ च्या १८ व्या
सिंचननामा प्रकाशन व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी व पाणी वापर संस्था यांचा गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा उद्या बुधवार दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.
नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रीकी संशोधन संस्थेच्या (मेरी) च्या इंजि.पां. कृ.नगरकर सभागृहात रंगभुमी, दुरचित्रवाणी,सिने अभिनेता व मंत्रालयातील जलसंपदा कर्मचारी
पंढरीनाथ कांबळे (पॅडी) यांचे शुभहस्ते व मेरीचे महासंचालक इंजि. संजीव अ. टाटू यांचे अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमास सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजि. डॉ. राजेन्द्र शुक्ला,उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता इंजि. प्रकाश मिसाळ,
मेरीचे सेवानिवृत्त महासंचालक इंजि. प्रमोद मांदाडे,जलविज्ञान मुख्य अभियंता इंजि. सुदर्शन पगार,यांत्रीकी
मुख्य अभियंता इंजि. जितेंद्र गंटावार,
लाक्षेवित्रा,नाशिक अधिक्षक अभियंता व प्रशासक इंजि. राजेश गोवर्धने,मेरीचे
अधिक्षक अभियंता इंजि. सुनिल चौधरी,जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव इंजि. प्रकाश भामरे, मुख्य अभियंता(सिडीओ)इंजि. राजेश मोरे,
अधिक्षक अभियंता(सिडीओ) इंजि. चंद्रकांत माळी,अधिक्षक अभियंता(रातासस) इंजि. श्रीकांत दळवी,मेटाचे अधिक्षक अभियंता इंजि. प्रमोद बाविस्कर,अधिक्षक अभियंता, (जलविज्ञान) इंजि.अंकुर देसाई,अधिक्षक अभियंता (यांत्रीकी) इंजि. नितीन पोटे, अधिक्षक अभियंता(सीडीओ) श्रीमती रजनी देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळयास उपस्थित राहावे असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले आहे.




