नेवासा/प्रतिनिधी
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये संघटनेची मजबूत बांधणी व संघटनात्मक उपक्रमशिलता वाढविण्याकरिता सावता परिषदेचे जिल्हा निरीक्षक जाहीर करण्यात आले असून कुकाणा येथील राहुल जावळे यांची जालना जिल्ह्याचे तर छत्रपती संभाजीनगर येथील प्रविण गाडेकर यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांनी निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मान्यतेने व राज्यप्रभारी मयुर वैद्य यांच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये संघटनेची मजबूत बांधणी व संघटनात्मक उपक्रमशिलता वाढविण्याच्या दृष्टीने सक्रिय प्रदेश व विभागीय पदाधिकारी यांना खालीलप्रमाणे जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.गणेश दळवी यांनी सांगितले.
नवनियुक्त जिल्हा निरीक्षक असे….
राहुल जावळे व सौ.शारदा कोथिंबीरे (जालना), प्रविण गाडेकर (अहिल्यानगर), शरद माने (मुंबई), पारस परमार (पालघर), सौ. संगिता खुणे(ठाणे), जयसिंग लोखंडे (कोल्हापूर),संतोष राजगुरू (सोलापूर),पांडुरंग कोठाळे (यवतमाळ,अकोला व चंद्रपूर),डॉ. राजीव काळे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. राजीव काळे (धाराशिव),भास्कर गाढवे (परभणी), साहेबराव जाधव व विठ्ठल गाभणे (नांदेड), शिवानंद झोरे (बुलढाणा), शामराव मेहेत्रे व नाना आमले (नागपूर),भाऊसाहेब वाघमारे (धुळे), गोरखनाथ राऊत(हिंगोली),प्रवीण वाघमारे (अमरावती व वर्धा),शिवाजी येवारे व मृदुल माळी(लातूर),कृष्णा कटारे(वाशिम),महादेव ताटे(सातारा), बापूराव धोंडे(बीड),सौ.साधना राऊत व श्रीकांत महाराज माळी(सांगली), प्रविण गाडेकर व सौ. मनिषा सोनमाळी(पुणे),संतोष राजगुरू (रत्नागिरी).




