Wednesday, November 26, 2025

संभाजीराजे दहातोंडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पदी निवड

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील चांदा येथील संभाजीराजे दहातोंडे पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील जिवाजीराव शिंदे संग्रहालय, मराठा मंदिर येथे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
त्यात नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेसाठी महाराष्ट्रभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभे दरम्यान प्रदेशस्तरीय तसेच राज्य कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.

नवीन राज्य कार्यकारिणीत अशी…

*प्रदेशाध्यक्ष-संभाजी दहातोंडे पाटील
*राज्य सचिव- विलास शंकर देसाई(सांगली)
*उपाध्यक्ष (विदर्भ)-राम मुळे (अकोला)
*उपाध्यक्ष-महेश सावंत(मुंबई-कोकण)
*उपाध्यक्ष-अनिल ताडगे(पुणे)

सभेत गेल्या वर्षातील उपक्रम व संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेऊन आगामी वर्षासाठी संघटनविस्तार, सामाजिक उपक्रम, युवकांचा वाढता सहभाग, तसेच शैक्षणिक-सामाजिक प्रकल्प या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत केले असून त्यांच्या नेतृत्वामुळे महासंघाच्या कार्याला अधिक दिशा, गती आणि परिणामकारिता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!