नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द ते नजीक चिंचोली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून लोकप्रतिनिधींनी या रस्त्याने सतत आठ दिवस प्रवास करून दाखविल्यास त्यांना ५१५५५ रुपयांचे रोख बक्षीस,शाल श्रीफळ देऊन जाहिर नागरी सत्कार करू असे देखात्मक आव्हान नागेश आघाव यांनी दिले आहे.
याबाबद अधिक माहिती देताना भेंडा खुर्द येथील नागरिक श्री.आघाव म्हणाले की,भेंडा खुर्द ते नजीक चिंचोली या ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची स्थिती सध्या अत्यंत दयनीय असून, रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे.रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहे. आजी माजी आमदार-खासदार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य
यांनी या रस्त्याचे कामाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे.
आमदार-खासदार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य किंवा त्यांची बायको-मुलं सतत आठ दिवस सकाळ संध्याकाळ दोन वेळा या रस्त्याने प्रवास करतील त्यांना आम्ही देणार पुरस्कार स्वरूप ५१५५५ रुपये रोख व शाल-श्रीफळ देऊन जाहिर नागरी सत्कार करू.


