माय महाराष्ट्र न्यूज.नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथील यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थानचे मठाधीपती श्री श्री १०८ महंत गुरुवर्य दिगंबरबाबा आराध्य व देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने व शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली असून दि.१ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत सदरचा यात्रा महोत्सव सोहळा साजरा होत आहे.
ग्रामदैवत शिनाई देवस्थान हे अतिशय पुरातन असे ५५० वर्षा पूर्वीचे जागृत देवस्थान असून या देवस्थानचा परंपरेनुसार चालत आलेला यात्रा महोत्सव दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावावी व या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक महंत आवेराज महाराज व भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


