Tuesday, March 31, 2026

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीकडून कन्यादान योजनेचा धनादेश प्रदान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुहासिनी किशोर मिसाळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कन्यादान योजनेअंतर्गत ५००० रूपयांचा पहिला धनादेश प्रदान करण्यात आला.

शुक्रवार दि.२९ ऑगस्ट रोजी  झालेल्या भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंच सौ.सुहासिनी मिसाळ यांनी  पुनर्विवाहासाठी १० हजार रुपये  तर  कन्यादान योजनेतून ५ हजार रुपये  देण्याचा ठराव मंजूर केला होता.

त्याप्रमाणे भेंडा बुद्रुक  गावचे रहीवासी विलास खंडागळे यांची कन्या चि. सौ.कां.साक्षी हिचा विवाह सुंदर मिसाळ यांचे चिरंजीव सुरज यांचेशी
रविवार दि.४ जानेवारी रोजी पार पडला. त्यावेळी वधू साक्षी हिला ५००० रूपयांचा धनादेश सरपंच सौ.मिसाळ यांचे हस्ते देण्यात आला.

श्री.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,उद्योजक बापूसाहेब नजन, किशोर मिसाळ,माजी उपसरपंच दादासाहेब गजरे, डॉ. लहानू मिसाळ, पावलस गोर्डे,कादर सय्यद, मायकल गोर्डे, अरुण गोर्डे,पास्टर विजय गोरे,यडू सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!