Sunday, March 29, 2026

सदानंद दाते यांनी स्वीकारला महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचा पदभार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद दाते यांनी आज महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला  शनिवारी  सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालक कोण असेल याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यातून सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर 30 डिसेंबरला शिक्कामोर्तब करण्यात आले आणि आज त्यांनी पदभार स्वीकारला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!