Saturday, June 13, 2026

प्रशासकीय दिरंगाईचा निषेधार्थ गांधीगिरी;नेवासा तहसीलदारांना ‘अलार्म घड्याळ’ भेट

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करण्यासाठी नेवासा तालुक्यात एक अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन पाहण्यास मिळाले. तक्रार देऊन दोन महिने उलटले तरी कारवाई होत नसल्याने संतप्त झालेले तक्रा सुहास बाळासाहेब वेताळ यांनी नूतन वर्षाचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालयाला ‘अलार्म घड्याळ’, ‘कालनिर्णय’ आणि ‘डायरी’ भेट देऊनआपला निषेध नोंदवला.

तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाबाबत वेताळ यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही महसूल विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाला वेळेचे भान राहावे आणि त्यांची ‘झोप’ उडावी, या उद्देशाने त्यांनी या वस्तू भेट दिल्या.
“प्रशासन ढिम्म असून त्यांना जागे करण्यासाठीच हे साहित्य दिले आहे. आता तरी नवीन वर्षात अवैध उत्खननावर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे,” असे वेताळ यांनी यावेळी सांगितले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगली असून, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

*नेवासा तहसील कार्यालयातच अस्वच्छता अन दुर्गंधी…

“एक कदम स्वच्छते की और” असे नेवासा तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे, परंतु कार्यालयात पूर्णपणे अस्वच्छता असल्याचे चित्र दिसत आहे.

तहसील कार्यालयामध्ये वावरत असताना सुहास वेताळ यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मार्फत हा व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात त्यांनी नेवासा तहसील कार्यालय मधील इमारतीमध्ये अनेक ठिकाणी कचरा तसेच तंबाखू खाऊन व गुटखा खाऊन थुंकून भिंती रंगवले आहेत तसेच व्हिडिओमध्ये प्रसारित झाल्याप्रमाणे कार्यालयीन इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे तसेच त्या ठिकाणी पुरुषांसाठी असलेल्या शौचालयामध्ये पूर्णपणे अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे अधोरेखित केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!