Wednesday, June 24, 2026

श्री विठ्ठल मल्टीस्टेट कडून पत्रकारांचा सन्मान

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी ली.या संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भेंडा गावातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

भेंडा येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी, कारभारी गरड,बाळकृष्ण पुरोहित, प्रा.संतोष सोनवणे, रमेश पाडळे, संतोष औताडे या पत्रकारांचा श्री.विठ्ठलाचा फोटो, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री.विठ्ठल मल्टीस्टेटचे अध्यक्ष कृष्णा गव्हाणे
म्हणाले की,बँकिंग क्षेत्रातील चढ-उतार आणि जनसामान्यांच्या समस्या, अन्याय होत असेल तर त्याची माहिती आपल्या लेखनातून समाजापर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विठ्ठल अर्बन बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. आज पत्रकारांचा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आंनद होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या व निर्भीड व निःपक्षपातीपणाने काम केलेल्या कामाची पावती म्हणून पत्रकारांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णा गव्हाणे, उपाध्यक्ष संतोष औताडे, संचालक बाळासाहेब कोलते,हौसिराम नवले, व्यवस्थापक सुरेश दरवडे,संजय गव्हाणे, कृष्णा मंडलिक,शुभम आढागळे, डॉ.लहानु मिसाळ,गणेश महाराज चौधरी, भगवान फुलारी, सुधीर चक्रणारायण, यांचेसह तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!