Thursday, April 23, 2026

नागेबाबा अन्नदान योजनेला नवले परिवाराकडून २१ हजाराची देणगी

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ नवले पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त नवले परिवाराच्या वतीने नागेबाबा अन्नपूर्णा योजनेसाठी २१ हजार रुपयाची देणगी देण्यात आली.

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट व नागोबा परिवाराचे वतीने नगर शहरात रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्णांचे नातेवाईकांसाठी अन्नदान योजनेतून दररोज ४०० ते ४५० जेवणाचे डबे पुरविले जातात.
ही योजना दात्यांच्या आर्थिक देणगीच्या माध्यमातून चालविली जात आहे. नवले परिवाराने या योजने करिता २१ हजार रुपये देगणी दिली. त्याचा धनादेश पत्रकार सुखदेव फुलारी व नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांनी स्विकारला. ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालिका रत्नामाला नवले, अशोकराव मिसाळ,उद्योजक किशोर नवले,रवींद्र नवले, सिद्धांत नवले,आबासाहेब काळे, बाळकृष्ण पुरोहित, सुनील गव्हाणे, अशोक वायकर,राजेंद्र चिंधे,सुभाष चौधरी, संभाजीराव माळवदे,वाल्मिक लिंगायत, संजय नवले,बापूसाहेब नवले,नानासाहेब नवले, हरिभाऊ नवले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!