Sunday, March 29, 2026

बंडू भागवत यांचा अपर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवाशी असणारे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात।स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णु त्रिंबक भागवत यांना चोरी प्रकरणाचा।तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

पोहेकॉ विष्णु भागवत हे स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर या ठिकाणी नेमणुकीस असतांना एमआयडीसी पोलीस ठाणे गुर.नं. 67/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3(5) प्रमाणे गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी ड्रायव्हर व क्लिनर यांना चाकुने जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांचे ताब्यातील 9 लाख 67 हजार 200 रुपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे जबरीने चोरुन नेलेले होते. नमुद गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन आरोपी नामे अर्जुनसिंग नारायणसिंग सरदार (वय 41 वर्षे), रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, सागरसिंग गुरजंदसिंग सरदार (वय 44 वर्षे), रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, कल्ला शब्बीरा कोहरी (वय 25 वर्षे), रा. कोलारस, ता. कोलारस जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, रतीलाम मदनलाल मदनलाल कोहरी (वय 40 वर्षे), रा. सबालगड, ता. सबालगड, जि. मुरैना, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एकुण 35 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांना फोर्स वन आणि प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांचे हस्ते व पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!