Sunday, February 15, 2026

नेवासा पोलीसांनी दमदार कारवाई;देशी बनावटीची पिस्टुल बाळगणा-या आरोपीस ३ जिवंत काडतुसे, १ मॅगझीनसह केले जेरबंद

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा पोलीसांनी दमदार कारवाई करून देशी बनावटीची पिस्टुल बाळगणा-या आरोपीस ३ जिवंत काडतुसे, १ मॅगझीन व एक मालवाहु वाहन असा एकुण ४ लाख ५०हजार ९०० रुपये किमतीच्या मुददेमालासह जेरबंद केले.

याबाबद अधिक माहिती अशी की,
दि. १४/०२/२०२६ रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, कुकाणा गावात नेवासा फाटा ते शेवगाव जाणारे रोडवर कुकाणा दुरक्षेत्रा समोर एक सुझुकी कंपनीच्या गाडीक. एम.एच. १६ सी.डी. ४४०५ मधील एका इसमाकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोहया शहाजी आंधळे यांनी लागलीच मिळालेली माहीती वरिष्टांना कळवुन कुकाणा दुरुक्षेत्र येथे दोन पंचांना बोलावुन कुकाणा दुरक्षेत्र येथील पोशी अमोल डमाळे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीधर लिपणे, अशांचा बोलावुन मिळालेल्या माहीती थोडक्यात सांगुन माहीतीची खात्री करण्यासाठी कुकाणा येथील तरवडी चौक येथे सापळा रचुन थांबले मिळालेल्या माहीती प्रमाणे एक मालवाहु वाहण क. एएम.एच. १६ सी.डी. ४४०५ असे तरवडी चौकात आले असता त्यास आम्ही थांबवुन पंचासमक्ष त्यातील चालकाला त्यास त्याचे अंगझडती घेण्याचा कायदेशीर उददेश सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १. संतोष कारभारी नरोटे वय. २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर असे सांगुन त्याची अंगझडती घेतली असतात्याचे कमरेलाएक देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह मिळुन आले पंचासमक्ष मॅगझीन खोलुन पाहिले असता त्यामध्ये तिन जिवंत काडतुस मिळून आल्याने नमुद आरोपीस पिस्तुल वे परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही, नमुद आरोपीने सदरचे गावठी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीर पणे स्वतः वे कब्जात बाळगल्याची खात्री झाल्याने नमुद आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या मुददेमालाचे वर्णन
असे..

१) ५०,०००/-रु कि.चा एक स्टील सारखे धातुचा त्यास बाउन रंगाची ग्रीप असलेला गावठी पिस्टल त्यास बेरेल, मॅक्झीन, ग्रीप, टिंगर असलेला गावठी बनावटीचा। पिस्टल जु.वा.कि.अं
२) ९००/-रु कि, ये तिन जिवंत काडतुस जु.या. कि.अं
३) ४,००,०००/-रु कि.चे एक सुझुकी कंपनीची सुपर कॅरी सी. एन. जी मोडेल वी मालवाहतुक गाडी कु
एम.एच. १६ सीडी ४४०५ अशी जु.वा.कि. अं एकूण ४,५०,९००/-रुपये.

येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा मुददेमालदोन पंचासमक्ष जप्त करुन आरोपी नामे संतोष कारभारी नरोटे वय, २२ वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याचे विरोधात पोशी अमोल डमाळे यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे गु. रंनं १११/२०२६ शस्त्र अधिनीयम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव निरज राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. महेश पाटील, सपोनि अमोल पवार, पोसई अहिरे, पोहवा शहाजी आंधळे, पोशी अमोल डमाळे, पोशी संदीप ढाकणे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीधर लियणे, यांनी केली असुन नमुद गुन्हयातील आरोपी अटक करण्यात आला आहे. असुन पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!