Wednesday, February 18, 2026

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे होणार अतिरिक्त तहसील कार्यालय

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि ६९ अतिरिक्त तहसील कार्यालय निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अतिरिक्त तहसील कार्यालय निर्मितिच्या समावेश आहे.

वाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
तर नव्या अतिरिक्त तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासह संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून तालुक्यांतील सर्वांत दूरच्या गावांचे अंतर तसेच प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव हा
स्वतंत्र तालुका व्हावा याकरिता घोडेगाव येथील फुले-शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. नवीन घोडेगाव तालुका व्हावा याकरिता ५३ ग्रामपंचायती पैकी ४६ ग्रामपंचायतीचे ठराव तहसील कार्यालय नेवासा येथे दाखल झालेले असल्याने भारतीय संविधानानुसार  घोडेगाव तालुका  निर्मिती कामी निर्णायक बहुमत मिळाले आहे. या मागणी बाबद सादर केलेल्या  प्रस्तावाचा १८० दिवसांचा शासकीय कालावधी देखील पूर्ण झालेला आहे. श्री.वैरागर हे पाठपुरावा करती असतांनाचा राज्य मंत्रिमंडळाने
अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयात गोडेगावचा समावेश असल्याने भविष्यात स्वतंत्र घोडेगाव तालुका निर्मितीस चालना मिळणार आहे.

*प्रस्ताविक ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी….

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात कल्याण, तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव. छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यात किनवट. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर.

*प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालये असे…

नेवासा(घोडेगाव),अकोले(राजूर),कुर्ला(चेंबूर),बोरिवली(मालाड),अंधेरी(वांद्रे),ठाणे(नवीन मुंबई), कल्याण( डोंबिवली), भिवंडी(भिवंडी ग्रामीण),डहाणू(कासा),वसई(विरार),
पालघर(बोईसर),राजापूर(रायपाटण),
खेड(चाकण),फलटण(साखरवाडी),
कराड(उंब्रज),उत्तर सोलापूर (वडाळा),
चंदगड (नजरे कार्वे), निफाड( लासलगाव),सिन्नर(सिन्नर),
बागलाण(नामपूर),जळगाव(जळगाव),
जामनेर(शेंदुर्णी),चाळीसगाव (चाळीगाव),नंदूरबार(नंदूरबार),
शहादा(शहादा),अक्कलकुवा(मोलगी),
शिरपूर(शिरपूरशहर),सिल्लोड(अजिंठा),बीड(नेकनूर),आष्टी(कडा),जालना(जालना शहर आणि राजूर),परभणी(परभणी),जिंतूर(बोरी),
लातूर(लातूर),नांदेड(नांदेड),हदगाव (तामसा),मुखेड(मुक्रमाबाद),किनवट(इस्लापूर),अमरावती (अमरावती ग्रामीण),अकोला(अकोला शहर),पुसद(शेंबाळपिंपरी),उमरखेड (ढाणकी),सिंदखेडराजा(साखरखेडा), मेहकर(डोणगाव),खामगाव(लाखनवाडा),वाशीम(अनसिंग),रिसोड(केनवड),कारंजा(कामरगाव),
नागपूरग्रामीण(बुटीबोरीआणि हुडकेश्वर),हिंगणा(वानाडोंगरी),नागपूर(नागपूर शहर),कामाठी(वडोदा),सावनेर(खापरखेडा),काटोला(कोंढाळी),नरखेड(जलालखेडा),मौदा(कोदांमेढी),कुही(वेलतूर),हिंगणघाट(अल्लीपूर),सेलू(सिंदी),पवनी(अड्याळ),चार्मेाशी(आष्टी),कुरखेडा(मालेवाडा),आरमोरी(वैरागड),धानोरा(पेंढारी),सिंरोचा (आसरअल्ली),एटापल्ली(कसनसूर),
अहेरी(जिमलगट्टा).

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!