Saturday, April 18, 2026

शिंगणापूर मंदिर, गावाच्या बाहेरील परिसरात मनाई आदेश जारी

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शिंगणापूर गावात, मंदिर तसेच गावाच्या बाहेरील सार्वजनिक रस्ते, चौक, बसस्थानक, प्रवेशद्वार किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी होत असलेला अडथळा किंवा उपद्रव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शिंगणापूर गावात व मंदिर परिसरात सार्वजनिक शांतता, सुरक्षितता व सोयीसाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १५२ (१) (a) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

शिंगणापूर गावाच्या बाहेरील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे, प्रवेश मार्ग किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उभे राहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना थांबवणे, दिशाभूल करणे अथवा मध्यस्‍थी करणे या कृत्यास तात्काळ प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये व भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली अनाधिकृत कृत्य करु नये. असे कृत्य करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी तात्काळ अशा सार्वजनिक ठिकाणावरुन हटावे व भविष्यात अशा स्वरुपाची कृत्ये करु नयेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!