Thursday, June 25, 2026

तरवडी जिल्हा परिषद शाळेच्या १०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

मंगळवार दि.२४ फेब्रुवारी रोजी मनोहर बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली तरवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमास मेजर संपत शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दरवडे, सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सचिन जगन्नाथ दरवडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जनार्धन भालेराव, सोपानराव नलगे, एकनाथ वडगे, वृक्षमित्र शंकरराव कन्हेरकर, बाबासाहेब बोरुडे, अनिल नाईक, राजू पाटील, जमाल सय्यद,शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण, शिक्षिका वैशाली जाधव, अर्चना भालसिंग यांचेसह माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्य व शिक्षकवृंद उपस्थित होते.

मोफत स्कूल बॅगचे वाटपासाठी ‘माझी शाळा माझा अभिमान ‘ अंतर्गत मेजर संपत नामदेव शिंदे यांनी स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिला.
यावेळी बोलताना मेजर शिंदे म्हणाले की,आपण या शाळेतून शिक्षण घेतले असून समाजा प्रती व शाळेप्रती आपले काहीतरी देणे लागते. त्या भावनेतून सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमा दरम्यान ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

शिक्षिका मनीषा धानापुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. माधवी संग्गम यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!