Thursday, February 26, 2026

एलसीबीची कामगिरी;नेवासा बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी पकडली

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा बसस्थानक, बसस्थानक परिसर आणि प्रवासा दरम्यान चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या बाबदची अधिक माहिती अशी की, फिर्यादी सौ.अर्चना अंबादास थोरात (वय ४६ वर्षे) रा. सदगुरुनगर नं.०२ जेलरोड, नाशिक रोड, नाशिक, ता.जि. नाशिक व त्यांची बहिण या नेवासा फाटा येथुन नेवासा येथे ऑटो रिक्षा मधुन येत असताना त्यांच्या जवळील दोन महिल्यांनी त्यांचे सामानाच्या बॅग मधील पर्स त्यामधील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ९२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली चोरीचे गुन्हा उघडकीस आणणेकामी सपोनि हरिष भोये, पोउपनि महादेव गुट्टे पोलीस अंमलदार दिपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, अतुल लोटके, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, सुनिल मालणकर, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, वंदना मोढवे, चिमा काळे, ज्योती शिंदे, सुवर्णा गोडसे, चालक महादेव भांड, उमाकांत गावडे, अर्जुन बडे तसेच महिला पोलीस अंमलदार छाया माळी, प्रभावती कोकाटे, कल्याणी आव्हाड, सीसीटीव्ही कक्ष यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवून, अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील महिला आरोपी नामे भाग्यश्री भोसले, रा. घोटण, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर हिने तिच्या साथीदारासह केला असुन ती नेवासा फाटा, ता. नेवासा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ नेवासा फाटा येथे जावुन सापळा रचुन शिताफिने, त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे १) भाग्यश्री सुनिल भोसले उर्फ भाग्यश्री जगदिश काळे, वय २३ वर्षे, रा. घोटण, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर २) नगिना सतिष भोसले वय २२ वर्षे, रा. शिरुर कासार, जि.बीड, हल्ली रा. पाथर्डी रोड, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर ३) सुरेखा राऊत चव्हाण, वय १९ वर्षे, रा. टाकरवण ता. माजलगांव, जि.बीड असे असल्याचे सांगितले आहे. वरील महिला आरोपी यांना गुन्ह्याबाबत सखोल व वारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा आम्ही तिघीनी मिळुन केले असल्याची कबुली दिली आहे.

आरोपीचे सांगणे प्रमाणे रु. १३,५०,०००/- कि.चे ९० ग्रॅम वजनाचे ७ सोन्याचे लगड एकुण रुपये १३,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपीने अशाप्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास करता आरोपीकडुन १० गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ते असे….

नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम ९२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२),गु.र.नंबर १०४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२),
पाथर्डी पोलिस स्टेशन गु.र.नंबर
१६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२),गु.र.नंबर १३८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२),
लोणी पोलिस स्टेशन गु.र.नंबर
५९४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),गु.र.नंबर
६३४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
कोपरगाव शहर पोलिस स्टेशन गु.र.नंबर २५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),
गु.र.नंबर ३४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),
गु.र.नंबर ३५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२),
कोतवाली पोलिस स्टेशन गु.र.नंबर
५७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. नमुद आरोपींकडुन इतर चोरीबाबतचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!