Wednesday, April 22, 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले संत श्री गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेगाव/प्रतिनिधी

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज शेगावच्या पवित्र भूमीत आगमन झाले असून त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत श्री गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील आणि हरिहर निळकंठ पाटील, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

महामहिम राष्ट्रपतींचे संस्थानच्यावतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेत मंदिर परिसराची माहिती घेत पाहणी केली.
यानंतर राष्ट्रपतींचे राष्ट्रीय आरोग्य मेळावा मुख्य कार्यक्रमस्थळी प्रस्थान झाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!