गुहा वार्ताहर: पत्रकार राहुल कोळसे: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाला काल 2 मार्च रोजी होळी पेटवून यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवार दि 3 मार्च रोजी सकाळी कानिफनाथ मंदिर समोरील प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली.या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रामा बर्डे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कोळसे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, डॉ तनपुरेचे संचालक अशोक उर्हे ,चैतन्य पतसंस्थाचे चेअरमन प्रमोद कोळसे, कानिफनाथ ट्रस्टचे अध्यक्ष नंदु सौदागर, अविनाश ओहोळ शिवाजी मांजरे,अनिल सौदागर,शरद वाबळे,विजय वाबळे, कैलास कोळसे,हरी कोळसे, अतुल कोळसे, नाना चंद्रे,यावेळी उपस्थित होते.
यात्रोत्सव कमिटी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- रामा बर्डे
उपाध्यक्ष – बाळासाहेब कोळसे
खजिनदार – राजेंद्र शिंदे ,सागर लांबे
सचिव- मंगेश काकडे
सहसचिव- संकेत चंद्रे
कार्याध्यक्ष – रामभाऊ शेख
मंदिर व्यवस्थापन – हर्षल अनिल कोळसे. सुनिल तारू, रुपेश सौदागर, श्रीहरी आंबेकर, संतोष पवार, श्री गंवादे, रामदास मदणे, युवराज मांजरे, योगेश राऊत, युवराज शिंदे
सदस्य : दीपक ओहोळ, किरण डौले, मच्छिंद्र आंबेकर,शुभम खपके,साजन भालेराव, सोमनाथ मदणे, रविंद्र मांजरे, बाळासाहेब राऊत,अमोल भांड, हरिश्चंद्र मोरे, नंदू ओहोळ, नामदेव कुचेकर ,धनेश्वर कोळसे, प्रशांत कोल्हे,बाबासाहेब आंबेकर,प्रदिप वर्पे, सागर खपके,अर्जुन कोळसे, जालिंदर काकडे,संतोष सौदागर, वैभव कडू,गौरव वाघ, रामनाथ मदणे,विष्णु गायकवाड, गौरव डौले,शंकर वाबळे,बाबु कुचेकर,गोरक्षनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.
या यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कानिफनाथ महाराज देवस्थान, यात्रोत्स कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.


