Thursday, August 13, 2026

भेंडा येथे होणाऱ्या पसायदान चिंतन सोहळयाचे ११ मे रोजी धर्मध्वजारोहण

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा परिवार व ग्रामस्थांच्या वतीने दि. १७ ते २३ मे २०२६  या कालावधीत अधिकमासा निमित्त आयोजित केलेल्या गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या पसायदान चिंतन सोहळयाचे धर्म ध्वजारोहण सोमवार दि.११ मे रोजी सकाळी ८ वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के व श्रीसंत जगद्‌गुरु तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे हस्ते होणार असल्याची माहिती नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांनी दिली.
भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन नागेबाबा परीवार, श्रीसंत नागेबाबा संस्थान व ग्रामस्थांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!