Saturday, June 27, 2026

भेंड्यातील पसायदान चिंतन सोहळयाचे धर्मध्वजारोहण संपन्न

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा परिवार व ग्रामस्थांच्या वतीने दि.१७ ते २३ मे २०२६  या कालावधीत अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या गाथामुर्ती  रामभाऊ महाराज राऊत यांच्या पसायदान चिंतन सोहळयाचे धर्म ध्वजारोहण सोमवार दि.११ मे रोजी सकाळी ८ वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के व श्रीसंत जगद्‌गुरु तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे हस्ते झाले.

 

अंकुश महाराज कादे, गणेश महाराज आरगडे, साहेबराव महाराज गव्हाणे, कुंडलिक महाराज गोरे,काशिनाथ पाटील नवले, नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे, तुकाराम मिसाळ, बाळासाहेब नवले, डॉ. रावसाहेब फुलारी, नामदेव शिंदे, शिवाजीराव तागड, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे,अजित मुरकुटे, डॉ.शिवाजी शिंदे,नामदेवराव निकम,गणेश गव्हाणे, वैभव नवले,बापूसाहेब भागवत, भाऊसाहेब फुलारी, देविदास गव्हाणे, अशोक वायकर, हेमंतगुरू कुलकर्णी, अड.रविंद्र गव्हाणे, अजित रसाळ, राजेंद्र चिंधे, शरद तांबे, भारत वाबळे,अण्णासाहेब गव्हाणे, बलभीम फुलारी, वाल्मिक लिंगायत यांचेसह नागेबाबा परीवाराचे स्वयंसेवक, श्रीसंत नागेबाबा संस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

महंत देविदास म्हस्के महाराज व महंत उद्धव मंडलिक महाराज यांनी मार्गदर्शन केले.

बापूसाहेब नजन यांनी प्रास्ताविक केले.अंकुश महाराज कादे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.
गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाटील नवले यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!