Thursday, May 28, 2026

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील घटना;दोन भाच्यांसह मामाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सोनई- खरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,
सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय १६ वर्षे) व विजय गणेश दरंदले (वय १४ वर्षे) यांना शाळेला सुट्टी लागल्याने ते मंगळवारी सकाळी खरवंडी येथील त्यांचे मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली तिघेही अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

नेवासा येथे शवविच्छेदनानंतर मंगळवारी सायंकाळी रामेश्वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बुधवारी सकाळी अभिषेक व विजय दरंदले या दोन्ही भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. अभिषेक व विजय हे प्रगतशील शेतकरी अर्जुन पाटीलबा दरंदले यांचे नातू तसेच माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब दरंदले यांच्या कुटुंबातील होते. रामेश्वर मराठे हे बाळासाहेब मराठे यांचे एकुलते एक पुत्र होते, तर गणेश दरंदले यांनाही अभिषेक व विजय हीच दोन मुले होती. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!