Monday, June 1, 2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुन करुन पळालेले दोन आरोपी नेवासा पोलीसांकडुन जेरबंद

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर मध्ये खुन करुन पळालेले दोन आरोपी नेवासा पोलीसांकडुन जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.

या बातमीतील अधिकची हकीगत अशी की, सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छञपती संभाजीनगर गु.र.नं.३५५/२०२६ भा. न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि.३०/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींनी छत्रपती संभाजीनगर मध्ये एका व्यक्तीची हत्या करुन ते घटनास्थळावरुन पसार झाले होते. सदर आरोपीपैकी दोन मुख्य आरोपी हे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची गोपनीय माहिती नेवासा पोलीसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी पोलीस पथक तयार करुन आरोपी शोध कामी रवाना केले.
सदर पथकातील पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ संतोष शिंदे, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ अतुल शेळके, पोकॉ भारत बोडखे, मपोकॉ वर्षा कांबळे यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे  प्रसन्नजित प्रमोद हिवाळे (वय २० वर्ष), रा. मुकुंदवाडी सिडको एन-२,छत्रपती संभाजीनगर, व अरुण पदमसिंग भुल (वय १९ वर्ष), रा.एन -७ ओम प्राथमिक शाळा,छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेवुन नेवासा पोलीस स्टेशन येथे आणले व सदर ताब्यात घेतलेल्या आरोपींताना सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आहे. पुढील तपास सिडको पोलीस स्टेशन जिल्हा छञपती संभाजीनगर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक  सोमनाथ वाकचौरे,वैभव कलुबर्मे  व उपविभागीय पोलीस अधिकारी  निरज राजगुरु  यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पो. उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ।संतोष शिंदे, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ अतुल शेळके, पोकॉ भारत बोडखे, मपोकॉ वर्षा कांबळे यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!