राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे गोकुळ अष्टमी च्या शुभ मुहुर्तावर देवगड देवस्थानचे महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांनी शिनाई मातेचे दर्शन घेऊन राष्ट्रसंत श्री श्री 1008 गुरुवर्य बाबाजी यांची भेट घेतली.

त्या प्रसंगी बाबाजींचा सन्मान देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी संतसेवक परिवारातील माऊली क्षिरसागर, रमेश काळे, पोपट भणगे, ह. भ. प. बाळु महाराज कानडे, संदिप साबळे, गोडसे मामा, सचिन जाधव, ऋषी क्षिरसागर, भास्कर भणगे, व समस्त ग्रामस्त भक्त मंडळ उपस्थीत होते.


