नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील श्रीसिद्धेश्वर इंग्लिश स्कूल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व शिक्षकवृंद यांच्यावतीने थोर समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
श्रीसिद्धेश्वर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब गायकवाड यांनी डॉ.दाभोळकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर विवेकवादी डॉ.दाभोळकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर विवेचन केले. युवक पिढीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची धुरा व विचारांचा वारसापुढे नेण्यासाठी प्रवृत्ती केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली .
भोंदूगिरी, जादूटोणा व बुवाबाजी यासारखे प्रकार पुनश्च डोके वर काढत आहेत त्यामुळे अंनिसचे कार्य प्रभावी करणे काळाची गरज आहे.
समितीचे जिल्हा पदाधिकारी बी.के. चव्हाण यांनी प्रवरा संगम परिसरात कृती कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली जाईल असे आश्वासित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पर्यवेक्षक विनोद सरोदे, महेश दरेकर, बाबासाहेब लाळगे, विजय कडाळे व अध्यापिका श्रीमती प्राजक्ता रासने यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यवेक्षक विनोद सरोदे यांनी आभार मानले


