भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा बुद्रुक येथील जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रेनिमित्त मीराबाई महाराज मिरीकर (श्रीक्षेत्र आळंदी) यांचे मार्गदर्शनाखाली व अंकुश महाराज कादे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.२५ ऑगस्ट पासून दि.१ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला आज मंगलवार दि.२५ पासून सुरुवात झाली आहे.
भेंडा बुद्रुक येथे दरवर्षी श्रावणी तिसऱ्या सोमवारी गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबाची यात्रा भरते.यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी यात्रा आहे. यात्रेनिमित्त दि.२५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.
मंगळवार दि.२५ रोजी अंकुश महाराज कादे,बुधवार दि.२६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम,गुरुवार दि.२७ रोजी
वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के,
शुक्रवार दि.२८ रोजी उमेश महाराज दशरथे,शनिवार दि.२९ रोजी श्री विठ्ठल
महाराज,रविवार दि.३० रोजी पोपट महाराज यावलकर, सोमवार दि.३१ रोजी महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज
यांचे कीर्तन होणार आहेत.
मंगळवार दि.०१ सप्टेंबर रोजी स.९ ते ११ यावेळेत गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर दादासाहेब गजरे, बाबासाहेब वाघडकर, गोरक्षनाथ वाघडकर व आसिफ पठाण यांच्या कडून उपस्थित भाविकांना महाप्रसाद पंगत देण्यात येणार आहे.
सप्ताह दरम्यान श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भारस्करगिरीजी महाराज हे सदिच्छा भेट देणार आहेत. भाविकानी लाभ घेण्याचे आवाहन नागेबाबा मंदिर व्यवस्थापन समिती व यात्रा समितीने केले आहे.


